जळगाव लाईव्ह न्यूज । लग्नाला अवघे १५ दिवस झाले असतानाच एका २६ वर्षीय नवविवाहित तरुणाने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना यावल तालुक्यात उघडकीस आली आहे. पत्नीचे लग्नापूर्वीचे अफेअर आणि तिच्या प्रियकराकडून मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या व बदनामीच्या धमक्यांमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी यावल पोलिसांनी मृत तरुणाच्या पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

मृत तरूणाचा विवाह अवघ्या १५ दिवसांपूर्वी एका तरुणीशी झाला होता. मात्र, विवाहानंतरही पत्नी ही तिचा प्रियकर विशाल युवराज पाटील याच्याशी सतत संपर्कात होती आणि फोनवर बोलत होती. ही पतीच्या निदर्शनास आली होती. १३ मे रोजी पतीचा मृतदेह गावालगतच्या एका शेतातील विहिरीत आढळून आला. त्यांच्या मृत्यूनंतर घरात एक चिठ्ठी सापडली, ज्यातून या आत्महत्येमागचा भयानक प्रकार समोर आला. मृत तरूणाला पत्नीचा प्रियकर विशाल पाटील हा सोशल नेटवर्कवर मेसेज करून सतत धमकावत होता. या मानसिक छळाला आणि भीतीला कंटाळून अखेर तरूणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी मयत मृत तरूणाच्या बहिणीने यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मृत तरुणाची पत्नी आणि तिचा प्रियकर विशाल युवराज पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रियकर विशाल पाटील याला पोलिसांनी तातडीने अटक केली. त्याला यावल येथील न्यायालयाचे न्यायाधीश जी.आर. कोतले यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपी विशालला २२ मे पर्यंत ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार वसंतकुमार बेलदार करत आहेत. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी कसून तपास केला जात आहे. सहायक










