⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

सुसाईड नोट लिहून जळगावातील तरुणाची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । कर्जबाजारीला कंटाळून जळगावातील ३९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अविनाश उर्फ बाळू अरुण बोरसे (वय-३९, रा. सुकृती अपार्टमेंट, अहुजा नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, अविनाशने आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात “मी कर्जबाजारी झालेला असल्याने स्वत:च्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहे” असे नमूद केल्याचे आढळून आले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, जळगाव शहरातील अहुजा नगरातील अविनाश उर्फ बाळू अरूण बोरसे हा पत्नी व मुलांसह संकृती अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे. काही दिवसांपासून अविनाश बोरसे यांची पत्नी बाहेरगावी गेल्या होत्या. त्यामुळे अविनाश घरी एकटाच होता. त्यावेळी गळफास घेऊन आत्महत्या केली.

काल शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अविनाशची आई सुनंदाबाई यांनी फोन लावण्याचा भरपूर प्रयत्‍न केला परंतू फोन लागत नव्हता म्हणून त्यांनी भाचा प्रशांत रमेश पाटील यांना फोन करून सांगितले की, अविनाशची तब्बेत बरी नाही, त्याचा फोन लागत नाही, त्याची पत्नी व मुलगी देखील घरी नाही, त्यामुळे तू घरी जावून बघ आणि मला सांग असे सांगितले. त्यानुसार प्रशांत पाटील हा घरी गेला असता अविनाशचा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने बाल्कनीमधून डोकावून पाहिले असता अविनाशने गळफास घेवून आत्महत्याचे केल्याचे दिसून आले.

दरम्यान, अविनाशने आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात “मी कर्जबाजारी झालेला असल्याने स्वत:च्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहे” असे नमूद केल्याचे आढळून आले. याबाबत तालुका पोलीसांना कळविण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.