जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । ३१ वर्षीय तरुणीने दाराच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील तेली चौकात घडली. विजय नामदेव खडके (वय-३१) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने कुटुंबियांना धक्का बसला आहे. आत्महत्या मागील कारण अद्यापही कळू शकले नसून याबाबत शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय खडके या तरुण रेमंड कंपनीत नोकरीस होता. गेल्या काही वर्षांपुर्वी आजारपणामुळे त्याच्या आई वडीलाचे निधन झाले आहे. त्यामुळे तो एकटाच घरात वास्तव्यास होता. आज सकाळच्या सुमारास विजय याने घराच्या दरवाज्याच्यावर असलेल्या खिडकीला दोरीच्या गळफास घेत आत्महत्या केली.सकाळच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश माळी, राहुल घेटे, परिस जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय हा घरात एकटाच राहत होता. तसेच तो रेमंड कंपनीत नोकरीस असून त्याचा स्वभाव हा मनमिळावू होता. घराकडे देखील तो कोणाच्या अधिक संपर्कात नसल्याने त्याने गळफास घेतल्याचे समजताच अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, विजयचा मृतदेह संशयास्पद असल्याने अनेकांनी घातपाताचा संयश देखील व्यक्त केला आहे.त्याच्या पश्चात तीन बहिणी आहेत.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?