⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

चौकशीसाठी गेलेल्या तरुणाला पहूर पोलिसांकडून मारहाण, पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ ।  गेल्या दोन दिवसापूर्वी कुत्रा समोर आल्याने वाकडी येथे महिलेला गाडीचा धक्का लागण्याच्या कारणावरून वरून  ज्ञानेश्वर प्रताप तवर याला जबर मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली याबाबत तक्रार का घेत  नाही असे विचारण्या गेलेल्या चुलत भावास पहूर पोलिसांनी जबर मारहाण केल्याची घटना गुरुवार रोजी घडली असून पोलिसांवर कायदेशीर कारवाई करा याबाबतचे लेखी तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.

याबाबत असे की, गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर प्रताप तंवर राहणार डोहरी तांडा हा ईसम पत्नीला घेण्यासाठी सासरवाडी कडे जात असताना वाकडे गावाजवळ अचानक कुत्रा समोर आल्याने त्याच्या दुचाकी वाहनाचे एका महिलेला धक्का लागला या कारणावरून सदर महिलेच्या नातेवाईकांनी ज्ञानेश्वर प्रताप नाही बेदम मारहाण केली व बेशुद्ध केले. त्याला उपचारासाठी गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते या घटनेत ज्ञानेश्वर तवर याचा मृत्यू झाला पहूर पोलिस स्टेशनला दोन दिवस नातेवाईक फिरत होते.

मात्र त्यांची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली त्यामुळे मयत यांचे चुलत भाऊ विकास संतोष तवर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा केली त्यांनी विकास तवर यांना पहूर पोलिस स्टेशनला या असे सांगितले विकास तवर पहूर पोलिस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी  पोलीस उपनिरीक्षक देवडे यांना विचारणा केली की तुम्ही आमची तक्रार का घेत नाही. याचा राग आल्याने पोलीस उपनिरीक्षक देवडे व पोलीस उपनिरीक्षक चेडे यांनी तू आमचा मालक आहे का असे सांगत विकास तवर यास लाथाबुक्क्यांनी व सरकारी पट्ट्यांनी जबर मारहाण केली.

याबाबत विकास संतोष तवर यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली असून सदर घटनेचा सीसीटीवी फुटेज मिळावा व पोलीस कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी व मयताला न्याय मिळावा अशी मागणी लेखी तक्रार द्वारे केली आहे. जर तक्रारींची चौकशी करण्यासाठी आलेल्या ना अशा प्रकारे पोलीस कर्मचारी मारहाण करत असतील तर राज्यात कायदा व्यवस्था राहीली का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.