गुन्हेयावल

उसनवारीच्या पैशाच्या वादातून तरूणाला लोखंडी फायटरने मारहाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । उसनवारीच्या पैसे घेण्याच्या वादातून दोघांनी लोखंडी फायटरने एकाला बेदम मारहाण करण्याची घटना शहरातील संभाजी पेठेत घडली. यावल पोलिसांत दोन व्यक्तिवर गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, सौरभ डिंगबर बैरागी (वय -२१) रा मटन मार्केट यावल यांचा मित्राचे पैसे गावातील अजय अशोक नारेकर रा बुरूज चौक याने घेतले होते. मित्राने घेतले पैसे काढून दे यासाठी अजय १९ मे रोजी सकाळी १० वाजता सौरभकडे गेला. त्यावेळेस सौरभने सांगितले की माझे आणि तुझा मित्राशी काहीही संबंध नाही असे सांगितले.

याचा राग अजय मास्तरला आल्याने अजय सोबत त्याचा भाऊ दिपक अशोक नारेकर यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. तर अजयने त्याच्या जवळील लोखंडी फायटरने सौरभच्या डोक्यात आणि मानेवर वार करून जखमी केले. सौरभ बैगारी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात मारहाण दोन्ही भावनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button