जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । येथील उमाळा परिसरात शेतात गेल्याच्या कारणावरुन एकास काठीने मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमाळा येथे ज्ञानेश्वर अमत बिऱ्हाडे वय ३० हा तरुण शेती करुन उदरनिर्वाह भागवितो. दि १२ एप्रिल रोजी ज्ञानेश्वर हा त्यांच्या गावातील रघुनाथ साहेबराव चव्हाण यांच्या शेतात गेला होता. शेतात गेल्याचे वाईट वाटल्याने शेतमालक रघुनाथ चव्हाण यांच्यासह इतर दोन जणांनी ज्ञानेश्वर यास डोक्यावर तसेच पाठीवर पायावर काठीने बेदम मारहाण करून दुखापत केली. या बाबत ज्ञानेश्वर याने दिलेल्या तक्रारीवरुन बुधवारी रघुनाथ चव्हाण, शुभम रघुनाथ चव्हाण व भगवान साहेबराव चव्हाण या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफूर तडवी हे करीत आहेत.