---Advertisement---
गुन्हे धरणगाव

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच तरुणाचा अत्याचार, तरुण फरार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । धरणगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच तरुणाने अत्याचार केल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी संशयित योगेश दिनकर कोळी या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

crime 3 jpg webp

याबाबत असे की, धरणगाव तालुक्यातील एका गावात पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई, बहीण व भाऊ अशा कुटुंबासह राहते. सहा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीच्या वडिलांचं निधन झालं आहे. सोमवारी रात्री ८ वाजता घरातील सर्वजण जेवण करून झोपले होते. रात्री ९ वाजता पीडित मुलगी लघुशंकेसाठी उठली असता त्याच परिसरातील संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याने अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिला ओढत नेत एका घरात तिच्यावर अत्याचार केला. मुलगी जागेवर नसल्याचं रात्री १० वाजता तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांसह अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. मध्यरात्री १२.३० वाजता अल्पवयीन मुलगी घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला.

---Advertisement---

दरम्यान, याप्रकरणी  मंगळवारी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याच्यावर लैंगिक अत्याचार कायदा व पोक्सो कायद्यांतर्गत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---