जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । यावल तालुक्यातील साकळी गावात एकाने मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. मात्र, कोणीही तक्रार न दिल्याने त्यास कायदेशीर समज देऊन सोडण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी संबंधितावर कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी शिवसेनेने पोलिसांना निवेदन दिले.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. संबंधितावर कारवाई करावी, यासाठी शनिवारी यावलला प्रभारी निरीक्षक तथा आयपीएस आशित कांबळे यांना निवेदन देण्यात आले. तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, उपशहर प्रमुख संतोष धोबी, युवासेना शहराधिकारी सागर देवांग, आदिवासी तालुका प्रमुख हुसेन तडवी, अजहर खाटिक, सारंग बेहेडे, सुनील जोशी, शरद कोळी, महेंद्र चौधरी, भरत चौधरी, पप्पू जोशी, कडू पाटील, मयूर खर्चे, गोपाल चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.