---Advertisement---
गुन्हे धरणगाव

Accident : चोपडा रस्त्यावर भीषण अपघात, दोन तरुण जागीच ठार!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । कामानिमित्त चोपडा येथे गेलेल्या धरणगाव येथील तरुणचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अपघातात दोघे तरुण जागीच ठार झाले आहे. ही आज दुपारी चोपडा रोडवरील पिंपळे गावाच्या फाट्याजवळ घडली. दरम्यान, धरणगावात हळहळ व्यक्त होत आहे.

savkhed 1 1

प्रदीप पाटील (वय २३) आणि किशोर पाटील (वय ३१ ) मयत तरुणाचे नाव आहे. हे दोघे तरुण धरणगाव शहरातील संजय नगर भागात रहिवाशी होते. हे दोघं आज कामानिमित्त चोपडा येथे गेलेले होते. दुपारी चोपड्याहून परत येतांना पिंपळे गावाच्या फाट्याजवळ असलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या वळणावर त्यांच्या दुचाकीचा (क्र. एमएच.१९ सीएच ३८९४) अपघात झाला.

---Advertisement---

हा अपघात इतका भीषण होता की, एकाची कवटीच फुटली तर दुसऱ्याच्या पायाचे तीन तुकडे झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मंडळी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. रस्ते अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे धरणगावात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---