Jamner : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

जानेवारी 7, 2026 11:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात एकीकडे वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून त्यात सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपरच्या धडकेत होणाऱ्या अपघाताचे प्रमाणही वाढत असून यात अनेकांना जीवावर मुकावे लागत आहे. अशातच भरधाव डंपरने मोटारसायकलला धडक दिल्याने तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना जामनेरच्या शहापूर गावाजवळ घडली घडली. गणेश माळी असं मृत तरुणाचं नाव असून या अपघातानंतर चालक डंपरसह पसार झाला.

ganesh mali

जामनेर-फत्तेपूर रस्त्यावरील शहापूरजवळ फत्तेपूरकडून येणाऱ्या भरधाव डंपरने जामनेरकडून फत्तेपूरकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. ही दुचाकी कसबा पिंपरी येथील गणेश भारत माळी चालवत होता. गणेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही नागरिकांनी डंपरचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण डंपर चालक सुसाट वेगात पसार झाला. विशेष म्हणजे या डंपरला नंबरप्लेट नव्हती.

Advertisements

सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपर चालकांवर कारवाई करावी, असे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी महसूल व पोलिस प्रशासनाला दिले होते. पण कारवाईचा केवळ देखावा होत असल्याने तरुणाचा बळी गेल्याचे मत मृत गणेशच्या नातेवाइकांनी व्यक्त केले.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now