यावलला राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक!

ऑगस्ट 11, 2022 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावलला राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. यात गेल्या मागील काही दिवसांचा संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम व ध्येय धोरणे व राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष आ. शरदचंद्र पवार यांचे विचार गावा गावात पोहचवण्यासाठी ‘वन बूथ टेन युथ’ हा कार्यक्रम हाती घेतला. तसेच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण वाईज बैठकी घेण्यासाठी नियोजन करण्यात आले.

group photo 1 jpg webp

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, विधानसभा शेत्र प्रमुख अनिल साठे, राष्ट्रवादी नेते शशिकांत पाटील, युवक तालुकाध्यक्ष ॲड.देवकांत पाटील, शहरअध्यक्ष हितेश गजरे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा सरचिटणीस अतुल चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, प्रशांत पाटील, तालुका कार्याध्यक्ष किशोर पाटील, शहर कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, तालुका समन्वयक किशोर माळी, तालुका उपाध्यक्ष समाधान पाटील, माजी युवक तालुकाध्यक्ष विकास पाटील, तालुका सरचिटणीस शुभम विसवे, रोहण महाजन, पवन खर्च आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now