⁠ 
सोमवार, मे 6, 2024

यावलला जुगार व पन्नीची दारू खुलेआम!

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । जिल्ह्यासह ग्रामीण भागात जुगार अड्डे व पन्नी दारू खुलेआम विक्री होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यावल शहारत देखील हा प्रकार सुरु असल्याचे समोर आले असून याकडे पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग व स्थानिक पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

यावल शहरात व ग्रामीण भागात जुगारामुळे पन्नीच्या दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून बनावट केमिकल युक्त पन्नी दारूमुळे तसेच बनावट देशी गावठी दारूमुळे अनेक युवक आणि नागरिकांचे अल्पावधीत निधन झाले आणि बरेच युवक आजही मृत्यूच्या मार्गावर उभे आहेत.शहरात बोरावल गेट पासून इतर ठिकठिकाणी पन्नीची दारू अनधिकृत पणे खुलेआम विक्री होत आहे, या गंभीर समस्या व प्रकाराकडे, युवक वर्गाच्या आरोग्य हिताच्या दृष्टिकोनाकड़े समाज शासन प्रत्यक्ष बघत असून अर्थप्राप्तीमुळे दुर्लक्ष करीत असल्याने समाजात पीडित कुटुंबांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

समाजात विशेष करून महिलांमध्ये शासनाविषयी लोकप्रतिनिधी विषयी संतप्त भावना व्यक्त करण्यात येत असल्याने पोलीस अधीक्षक जळगाव,आणि गुन्हे अन्वेषण विभाग जळगाव व स्थानिक पोलिसांनी अवैध पन्नी दारू व अवैध जुगार अड्ड्यांवर एकाच वेळेला धाडी टाकून कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावल शहरातून होत आहे.