⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

यावलला पारंपरीक वाद्याने वेधले लक्ष, पाच दिवसांच्या उत्सवानंतर बाप्पांना निरोप!

yawal news-जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२२ । यावल शहर व तालुक्यातील पाच गावातील पाच दिवसांच्या बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. सकाळी पोलिसांच्या वतीने सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यासह विसर्जन मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला. दुपारनंतर मिरवणुकीला सुरवात करण्यात आली. काही मंडळांनी पारंपरीक वाद्य-वृंदाच्या गजरात सकाळीच श्रींची मिरवणूक काढत दुपारी विसर्जन केले. मुख्य मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालली. निर्धारीत वेळेत मिरवणुका पार पडल्या.

पाचव्या दिवसाच्या बाप्पाला यावल शहरातील 21 मंडळाच्या वतीने मोठ्या जल्लोशात वाद्य, वृंदाच्या गजरात निरोप देण्यात आला. शहरात रविवारी सकाळी फैजपूरचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सीआरपीएफचे अधिकारी इंद्रनिल दत्ता, शशीकांत रॉय, संतोष कुमार यादव, गुलाबसिंग झारीया, अजयकुमार सिंग, मोहनलाल बोंदूले, रामचेंद्र पाटील, बाबुलाल गहलोतसह 100 सशस्त्र जवान, पोलिस उपनिरीक्षक, सहायक फौजदार, हवालदार, होमगार्ड अशा शेकडोच्या संख्येतील अधिकारी-कर्मचार्‍यांनी शहरातील विसर्जन मार्गा वरून रूट मार्च काढला तसेच पाचव्या दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन असलेल्या नायगाव, कोरपावली, डांभुर्णी, दहिगाव व सावखेडासीम येथे देखील पोलिस बंदोबस्त लावण्यात आला

शहरात सकाळी बारीवाडा गणेश मंडळाच्या वतीने पारंपरीक शेंबड वाद्यच्या सहभागाने मिरवणुक काढत दुपारीचं विसर्जन करण्यात आले व या मंडळाने पारंपरीक वाद्य लावून समाजापुढे आदर्श ठेवला तर शहरात मुख्य मिरवणूक सायंकाळी सुरू झाली. प्रशासनाकडून ठरवन दिलेल्या वेळेत मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली. शहरातील काझी मशिदीजवळ शांतता समितीच्या सर्वधर्मीय पदाधिकार्‍यांकडून विसर्जन मिसवणुकीचे स्वागत करण्यात आले.

गणेश विसर्जन मिरवणुका शहरातील रेणुका माता मंदिराजवळ विसर्जित होतात व पुढे तारकेश्वर महादेव मंदिराकडून विर्सजना करीता गणेश मंडळ मार्गस्त होतात. तारकेश्वर महादेव मंदिराच्या मागे नगर पालिकेकडून विसर्जन कुंड उभारण्यात आले होते तर तेथे श्री स्वामी समर्थ केंद्र व नगरपालिके कडून निर्माल्य संकलन केंद्र उभारल होते येथे अनेक मंडळांनी पुजा व निर्माल्य अर्पण केले.

पाचव्या दिवसाच्या बाप्पाला यावल शहरातील 21 मंडळांनी तसेच नायगाव येथील एक गाव एक गणपती एक, कोरपावली गावातील चार सार्वजनिक मंडळ, डांभूर्णी सहा मंडळ, दहिगावातील तीन मंडळ तर सावखेडासीम एक अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून बाप्पाला निरोप देण्यात आला.