यावल नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक प्रभाग रचना जाहिर

मार्च 11, 2022 12:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमिर पटेल । यावल येथील नगर परिषद निवडणूकिची प्रारूप प्रभाग रचना गुरुवारी येथील प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडी यांनी नगरपरिषद शहर तलाठी व तहसील कार्यालयासह पालिकेच्या संखेतस्थळावर प्रसिद्ध केली असून पहिल्या दिवशी एकही सुचना / हरकत नगरपरिषद प्रशासनात प्राप्त नाही.

yawal 4 1 jpg webp

आगामी पंचवार्षिक निवडणूकिसाठी प्रारूप रचने नुसार शहरात अकरा प्रभाग करण्यात आले आहे. त्यानुसार एक प्रभागाची वाढ झाली असून येणाऱ्या आगामी निवडणूकिनंतर यावल नगर परिषदेचे सदस्यांची संख्या २३ राहणार आहे. गेल्या पंचवार्षिक सर्वत्रिक निवडणूक तुलनेत यावेळीची नगरसेवक संख्या ३ ने वाढली आहे. यामध्ये अनुसुचीत जाती, अनुसुचित जमाती’ राखिव मधुन प्रत्येकी एक – एक महिला आरक्षणासह दोन – दोन जागा तर खुल्या प्रवर्गातील १० महिला आरक्षण १९ जागा खुल्या प्रवर्गात राहतील अशा एकूण २३ नगरसेवक सदस्य संख्या राहणार आहे.

यावल नगरपालिका गेल्या पंचवार्षिक निवडणूकित नगरसेवकांची संख्या ही २० होती यावेळेस मात्र ३ जागा वाढल्याने एकूण संख्या २३ झाली आहे. नगराध्यक्षाची निवड ही नगासेवकातुन होणार आहे . प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती मागवण्याची शिवटची मुद्दत ही १७ मार्च पर्यंत करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now