खासदार रक्षा खडसेंच्या हस्ते संत मुक्ताई व महादेवाची पूजा

मार्च 1, 2022 6:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र तापीतीर मेहून येथील पुरातन महादेव मंदिर व मुक्ताई मंदिरात खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते संत मुक्ताईचे व महादेवाची पूजा व आरती करण्यात आली.

vandhan jpg webp

यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनी श्री क्षेत्र मेहून (तापीतीर) संस्थानाचे अध्यक्ष रामराव महाराज, सुधाकर महाराज, पुजारी भानुदास महाराज, सचिव दत्तू पाटील, विकास पाटील व समस्त विश्वस्त मंडळ यांच्याशी संस्थानात होणाऱ्या विविध विकास कामे, धार्मिक कार्यक्रम व इतर बाबींविषयी सविस्तर चर्चा केली.

आमदार पाटीलांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

मुक्ताई-चांगदेव यात्रोत्सवाची आज सांगता झाली. श्री क्षेत्र मेहुण व तापी-पुर्णा पवित्र संगमावरील श्री क्षेत्र चांगदेव येथील मंदिरात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा करण्यात आली.

पाटील यांनी मुक्ताई मंदीरातील रखडलेल्या कामाविषयी बोलताना येणाऱ्या अधिवेशनात या कामासाठी निधी ची तरतुद करणार आहोत. व लवकरच अपुर्ण काम पुर्णत्वास नेणार अहल्याचे सांगितले. चांगदेव येथे हेमाड पंथीय पुरातन मंदिर असुन महाशिवरात्री च्या पर्वावर दरवर्षी यात्रोत्सव भरत असतो. या यात्रोत्सवाला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. भागवत एकादशी पासुन महाशिवरात्री च्या पाडव्या पर्यत असा पाच दिवस यात्रोत्सव चालतो. वारकऱ्यांसह लाखो श्रध्दाळु भाविकांची उपस्थिती महाशिवरात्री निमित्त येथे असते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now