गुन्हेजळगाव जिल्हा

Pachora : विहिरीत काम करताना कामगारा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२४ । पाचोरा तालुक्यातील वडगाव मोलाणे येथे विहिरीत दुरुस्तीच्या कामासाठी उतरलेल्या तरुण कामगाराला विजेचा जोरदार झटका बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. कैलास युवराज पाटील (वय ४७) असे मयत मजुरांचे नाव आहे.

भडगाव येथील रहिवासी कैलास पाटील हे विहीर दुरुस्तीचे काम करून कैलास परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान १८ जूनला देखील ते सकाळी पाचोरा तालुक्यात वडगाव मोलाणे येथे दिघी शिवारात शेतात विहिरीच्या बांधकामासंदर्भात बोलावले होते. विहिरीत काम करीत असताना महावितरणच्या वायरमुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.

विजेचा धक्का बसून फेकले गेलेल्या कैलास यांना तत्काळ पाचोरा रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, मजुराच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांनी आर्थिक मदतीची मागणी शासनाकडून केली आहे. तर हा मृत्यू महावितरणच्या दुर्लक्षामुळे झाला असल्याचे सांगून त्यांनी भरपाई द्यावी; अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. दरम्यान महावितरणकडून २० हजाराचा धनादेश देण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button