⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | वरणगाव शहराजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

वरणगाव शहराजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२४ । राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहराजवळ भीषण अपघात झाला आहे. नादुरुस्त ट्रकवर मागून भरधाव वेगात येणारा टँकर आदळला. या अपघातात ट्रक आणि टँकर चालक या दोघांचा मृत्यू झाला.

याबाबत असे की, भुसावळकडून मुक्ताईनगरकडे जाणारा (क्र.सीजी.०४-जेडी.०५१७ ट्रक ) अचानक नादुरुस्त झाला. त्यामुळे हा ट्रक महामार्गावर बाजूला उभा करून चालक नदीम नसीम खान (रा. नागपूर) हे ट्रकच्या खालील बाजूने जाऊन पाहणी करत होते. नेमके यावेळी मागील बाजूने येणारा बारा चाकी टैंकर (क्र.एमएच.४१-एयू ४६४ ६) ने नादुरुस्त ट्रकला मागून जोरदार धडक दिली.

कुंभकरण (रा.अमेठी, उत्तर प्रदेश) हा टँकर चालवत होता. या धडकेत टँकरच्या केबिनचा चुराडा झाला. त्यात अडकल्याने कुंभकरण, तर नदीम नसीम खान हे त्यांच्या ट्रकखाली सापडून गंभीर जखमी झाले. दोघांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पण, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. हवालदार सुक्राम सावकारे यांच्या फिर्यादीवरून टैंकर चालक कुंभकरण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.