जळगाव जिल्हाजळगाव शहर

पक्ष वाढीसाठी निस्वार्थपणे कार्य करा, मी आपल्या पाठीशी – ना. गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिवसेनेचे नेते तसेच पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी संघटनवाढीसाठीच्या भविष्याच्या वाटचाली विषयी पाटील यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यकर्ता दशकातील किस्से व अनुभव युवासैनिकांना आवर्जून सांगितले.

पक्ष व संघटन वाढीसाठी स्वतःला झोकून निस्वार्थपणे कार्य करा, मी भक्कमरिते आपल्या पाठीशी आहे असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी उपस्थतीत युवासैनिकांना दिला. युवासेना करीत असलेले कार्य उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. करीत असलेले कार्य अविरतपणे, चिकाटीने करीत नवीन समविचारी, राष्ट्रसेवेच्या भावनेने ओतप्रोत युवकांना सोबत जोडून युवासेना जळगाव जिल्ह्यातील कान्या-कोपऱ्या पर्यंत पोहोचवा अशे सूचक विधान केले.

या वेळी युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, उपमहानगर अधिकारी सचिन हिवराळे, हितेश ठाकरे, यश सपकाळे, समन्वयक संकेत कापसे, विद्यापीठ अधिकारी अंकित कासार, युवती अधिकारी वैष्णवी खैरनार, जया थोरात, विभाग अधिकारी चेतन कापसे, तेजस दुसाने, अमित जगताप, शंतनु नारखेडे, प्रीतम शिंदे आदि उपस्थित होते.

Related Articles

Back to top button