वराडसीम येथील पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । भुसावळ तालुक्यातील वराडसीम ते जोगलखोरी रस्त्याचे काम गेल्या ६ ते ७ महिन्यापासुन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चालु आहे. रस्ता काही टप्यात पूर्ण झाला आहे. पंरतु, तळ्यावरील पाण्याच्या टाकीजवळ ठेकेदाराने पूलासाठी चारी खोदुन पाईप ठेवले आहे. मात्र, त्याला एक महिना झाला असून अद्याप हे काम झाले नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून हे काम तत्वरित होणे गरजेचे आहे.
या ठिकणी पर्यायी रस्ता तयार करुन दिला आहे. परंतु, तो ही व्यवस्थित नसल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना वाहन काढतांना फार मोठी कसरत करावी लागत आहे. येथील काही नागरिकांनी याची तक्रार केली असून याकडे कुणीही लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी तत्वरित लक्ष घालून सदर काम सुरळीत करून द्यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.