⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | महिला लोकशाही दिनाचे 17 मे, रोजी ऑनलाइन आयोजन

महिला लोकशाही दिनाचे 17 मे, रोजी ऑनलाइन आयोजन      

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

          जळगाव लाईव्ह न्युज | ९ मे २०२२ | 16  मे, 2022 रोजी बुध्द पोर्णिमा निमित शासकीय सुट्टी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दिनांक 17 मे, 2022 रोजी महिला लोकशाही दिन  सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. 

          समस्याग्रस्त व पीडीत महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, शासकीय यंत्रणांकडून सोडवणुकीसाठी समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होवून प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी हा उपक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार 16  मे, 2022 रोजी बुध्द पोर्णिमा निमित शासकीय सुट्टी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दिनांक 17 मे, 2022 रोजी महिला लोकशाही दिन ऑनलाइन आयोजीत करण्यात आलेला आहे. या लोकशाही दिनी ज्या महिलांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई- मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला व्हॉटसॲप क्रमांक  नमूद करावा, जेणेकरुन या लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

            ई- मेल आयडी असे : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव- [email protected], तहसीलदार, जळगाव- [email protected], तहसीलदार, जामनेर- [email protected], तहसीलदार, एरंडोल-  [email protected], तहसीलदार, भुसावळ- [email protected], तहसीलदार, धरणगाव- [email protected],तहसीलदार, बोदवड- [email protected] तहसीलदार, यावल- [email protected], तहसीलदार, रावेर- [email protected], तहसीलदार, भडगाव- [email protected], तहसीलदार, चाळीसगाव- [email protected], तहसीलदार, अमळनेर- [email protected], तहसीलदार, पारोळा- [email protected], तहसीलदार, पाचोरा-  [email protected], तहसीलदार, मुक्ताईनगर- [email protected], तहसीलदार, चोपडा- [email protected]

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.