गुन्हेभुसावळ

महिलेचा कारनामा! रेल्वेच्या बोगीला लावली आग, घटना सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । भुसावळ रेल्वे (Bhusawal Railway Station) स्थानकावर सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कांद्याची वाहतुक करत असलेल्या किसान एक्स्प्रेस भुसावळ रेल्वे स्थानकावर उभी असताना एका महिलेकडून बोगीत आग लावण्याचा प्रयत्न झाला. बोगीला आग लागल्याचे लक्षात येतात रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सांगोला येथून मुजफ्फरपुरकडे जाणारी किसान रेल्वे भुसावळ स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 7 वर उभी होती. यावेळी माथेफिरू महिलेने किसान रेलच्या बोगीत माचिसची जळती काडी खिडकीतून फेकत बोगीला आग लावण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

स्थानकावरील बोग्यांची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आली. इंजिनपासून पाचव्या क्रमांकाच्या (Bhusawal) बोगीतून धूर येत असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी ताबडतोब गाडीचे चालक व गार्ड यांना सूचना दिली. या वेळी फलाटावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी मदत केली.

यावेळी आरपीएफ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. नेमकी आग कशी लागली, याची पाहणी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका माथेफिरू महिलेने आगपेटीची काडी पेटवून रेल्वेच्या डब्यात फेकल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. रेल्वे पोलिस या महिलेचा शोध घेत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button