---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

जामनेर हादरले! संशयातून प्रियकराने केला महिलेचा खून

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२४ । जामनेर तालुक्यातील शहापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. विधवा असलेल्या महिलेसोबत संबंध असताना डोक्यात संशयाने घर केले. यातून दोघांमध्ये वाद होऊन प्रियकराने महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. संगीता पिराजी शिंदे (वय ३६) असे घटनेतील मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून याबाबत संशयित मारेकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

murder raver

तर यातील मुख्य सूत्रधार असलेल्या संशयित किरण संजय कोळी (वय २६, रा. तळेगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. दरम्यान मृत संगीता या महिलेचे संशयित किरण कोळी याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचेही सांगण्यात येत आहे. असे असताना किरणच्या डोक्यात वेगवेगळ्या संशयानी घर केले होते. त्यातच १ जुलैला सकाळी दहाच्या सुमारास किरण हा महिलेच्या घरी आला. तिथे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या किरण कोळी याने महिलेच्या डोक्यात दगड टाकला आणि अन्य अवजड वस्तूनेही प्रहार केले.

---Advertisement---

डोक्याला जबर मार लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरण शिंदे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, संशयित घटनास्थळावरून पळून जात असताना शहापूरजवळच असलेल्या तळेगाव परिसरात निरीक्षक शिंदे व पथकाने ग्रामस्थांच्या सहकार्याने संशयिताला पकडले. संशयितावर नवीन लागू झालेल्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---