जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२२ । महामार्गाच्या कडेने शौचास जात असलेल्या ६५ वर्षीय वृद्धेस भरधाव ट्रकने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. रमणबाई रामराव पाथरवट (वय ६५, रा. भगीरथ कॉलनी) असे मृत वृद्धेचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालक न थांबता धुळ्याच्या दिशेने पसार झाला. याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, पाथरवड ह्या माठ विक्री करून उदरनिर्वाह करीत होत्या. दोन-तीन दिवसांपासून त्या मुलीकडे वास्तव्यास आल्या होत्या. मुलगी जिजाबाई राजेंद्र कोल्हाटकर या त्यांच्या सासरच्या मंडळींसह महिला आयटीआयजवळ रस्त्यावर माठ विक्री करतात. तत्पुत्या झोपड्या उभारून तेथेच वास्तव्यास आहेत. शनिवारी सकाळी ८ वाजता रमणबाई पाथरवट या शौचास निघाल्या होत्या.
महामार्गाच्या बाजूने पायी चालत असताना आकाशवाणी चौकाकडून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक न थांबता धुळ्याच्या दिशेने पसार झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- महाराष्ट्रातील या भागात पावसाचा अंदाज: शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला..
- ग्राहकांना दिलासा ! मकर संक्रांतीनंतर जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदीचा भाव घसरला..
- भारताची ताकद आणखी वाढणार; नौदलाच्या ताफ्यात ‘या’ ३ शक्तीशाली युद्धनौका दाखल