जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२१ । धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत ४५ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना पाळधी-जळगाव दरम्यान डाऊन लाइनवर घडली. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
मृत महिलेकडे कुठल्याही प्रकारचे ओळख हाेईल असे कागदपत्र आढळून आले नाही. त्यामुळे मृतदेह ओळख पटवण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ठेवला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.