⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | कुटुंबिक वादातून महिलेची आत्महत्या ; बहिणीने केला घातपाताचा आरोप

कुटुंबिक वादातून महिलेची आत्महत्या ; बहिणीने केला घातपाताचा आरोप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ ।  कुटुंबिक वादातून ५० वर्षीय महिलेने घरात कुणी नसतांना घराच्या छताला दोर बांधून आत्महत्या केल्याची घटना पाचोरा लोहटार येथे मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत महिलेचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे यांनी केले. गळफास घेतलेल्या घराची उंची केवळ सात फुट असुन गळफास घेतांना पायाखाली महिलेने कोणतीही वस्तू ठेवलेली नव्हती. तीला तीन वर्षांपासून मूलबाळ होत नसल्याने पती सतत मारहाण करीत असे त्यामुळे माझ्या बहिनेने आत्महत्या केलेली नसून तीला प्रथम ठार मारुन नंतर फासावर लटकविले अशी माहिती मयत महिलेचा मोहाडी तालुका पाचोरा येथील भाऊ समाधान उखा सिरसाठ याने जळगाव लाईव्ह शी बोलतांना सांगितले.

लोहटार येथील सुनंदा खंडू अहिरे वय ५० या विवाहित महिलेने दिनांक २५ रोजी सायंकाळी सहा वाजता घराचे छताला दोर बांधून गळफास घेऊन आमहत्या केली. मयत सुनंदा खंडू अहिरे ही पती खंडू श्रावण अहिरे हा पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली कामासाठी गेल्यानंतर तीच्या पहाण येथी बहिण उषाबाई भास्कर जाधव हिच्याकडे गेली होती. बहिनीस मला माझ्या पतीने मारहाण केली आहे असे सांगीतल्या नंतर उषाबाई जाधव हिने तीची समज काढून दुपारी तीन वाजता सूमारे दिड किलोमीटरवर अंतरावर असलेल्या हडसन गावापर्यंत पोहचवून ती माघारी फिरली व मयत सुनंदा खंडू अहिरे ही लोहटार येथे चार वाजता घरी आल्या नंतर गावातील पिठाच्या गिरणीहुन दळण दळून आल्यानंतर राहत्या घरी गळफास घेतला,मयताचा भाऊ समाधान सिरसाठ यास लोहटारहून फोन आल्यानंतर त्याने मी येईपर्यंत माझ्या बहिनीचा मृत देह खाली उतरवू नका असे सांगीतल्या नंतरही मृतदेह खाली उतरविला होता.

तीच्या विवाहाला तीस वर्षे झाले असतांना तीला मुलबाळ होत नव्हते तीचा पती सतत मारहाण करीत असल्याचे ती माहेरी आल्यानंतर सांगत होती मात्र तीची समज काढून आम्ही सासरी नांदायला पाठवित होतो, मात्र त्याचा परिणाम आम्हाला असा पहावयास मिळाला असेही समाधान सिरसाठ याने सांगितले तर मयताचे पती खंडू श्रावण अहिरे याने मी पाचोरा येथील बाजार समितीत हमालीचे काम करतो तीने मला सकाळीच जेवणाचा डबा बनवून दिला होता आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता मी रात्री घरी गेल्यानंतर घटना समजली.घटनेप्रकरणी आकस्मात मृत्तूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपानंतरच आत्महत्या की हत्या याबाबतचा उलगडा होणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.