मान्सूनपूर्वीच जळगाव जिल्ह्यातील ७ कृषी परवाने निलंबित !

मे 23, 2025 1:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । लवकरच मान्सून देशात पोहोचणार आहे. मात्र मान्सूनपूर्वीच विविध कारणास्तव कृषी विभागाने जिल्ह्यातील ७ कृषी परवान्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. भरारी पथकाच्या तपासणीत विविध कृषी केंद्रांमध्ये अनियमितता तसेच नियमांचे उल्लंघन आवळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यात ज्यामुळे सदरील परकनाधारकोवर कारवाई करण्यात आली आहे.

fertilizer parvana

राज्य शासनाच्या आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने मार्च महिन्यापासून कृषी केंद्रांची तपासणी सुरू झाली आहे. या तपासणीत अनियमिततेसह अन्य बेकायदेशीर बाची निदर्शनास आल्याने नोटीस बजावून या विक्रेत्यांना म्हणणे माढण्याची संधी दिली होती. त्यानुसार अंतिम सुनावणीत ७ कृषी परवाने निलंबित केले आहेत

७ तालुक्यांत कारवाई
परवाने निलंबित झालेल्या कृषी केंद्रांमध्ये पारोळा, यावल, चाळीसगाव, धरणगाव तालुक्यातील प्रत्येकी दोन परवानाधारकांचा समावेश आहे. तर जामनेरमध्ये एका परवानाधारकावा निलंबनाची कारवाई करणयात आली आहे. चोपडा तालुक्यातील तावसे, पारोळ्यातील मुंदाणे व मिलाली, पाळीसगावमधील तांबोळे व कुझर, पाळची ता.धरणगाव व धरणगाव, यावलमधील दहीवद पाडळसे व जामनेर शहरातील एका विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment