जळगाव शहरातील स्मशानभूमीतून सोन्यासाठी महिलेची अस्थी चोरीला गेल्याने खळबळ

ऑक्टोबर 7, 2025 4:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२५ । आजवर आपण पैसे, दागिने, वाहन, मोबाईल चोरीला गेल्याचे ऐकलं असेल. पण जळगाव शहराच्या मेहरून स्मशानभूमीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी एका वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कार उघडकीस येताच कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कुटुंबीयांकडून अस्थी परत करण्याची भावनिक मागणी केली आहे. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

chhababai patil

जळगाव शहरातील गायत्री नगर येथील छबाबाई काशिनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर सोमवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला होता. मयत छबाबाई पाटील यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने त्यांच्या इच्छेनुसार काढण्यात आले नव्हते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री स्मशानभूमीतून त्यांच्या अस्थीतील डोक्याचा, हाताचा आणि पायाचा भाग चोरून नेल्याची घटना घडली.

“सोनं नको, फक्त आमच्या आईच्या अस्थी परत करा,” अशी मागणी मयताच्या कुटुंबांनी केली आहे. पण अद्याप कुणीच अस्थी परत दिल्या नाहीत. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदार सुरेश भोळे यांनीही महापालिकेवर ताशेरे ओढले असून, मेलेल्या नागरिकांचीही अस्थी सुरक्षित नाही, ही लाजिरवाणी बाब असल्याचे मत व्यक्त केले. सदर प्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नसला तरी, चोरट्यांचा शोध घेणे ही पोलिसांसमोर मोठी जबाबदारी आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now