⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | गुन्हे | २० हजाराची लाच घेताना वायरमन जळगाव एसीबीच्या जाळ्यात

२० हजाराची लाच घेताना वायरमन जळगाव एसीबीच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२४ । जळगावमधून लाचखोरीची एक मोठी बातमी समोर आलीय. नवीन वीज कनेक्शन सुरु करण्यासाठी १० हजार रुपये देऊनही पुन्हा २० हजार रुपयांची स्वीकारताना वरिष्ठ तंत्रज्ञ विक्रांत अनिल पाटील देसले (वय ३८ वर्षे, शिरसोली युनिट रा .माऊली नगर, जळगांव) याला जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली. दरम्यान याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

याबाबत असे की, जळगाव शहरात राहणाऱ्या ४८ वर्षीय तक्रारदार यांचे घराचे बांधकाम साईटचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर ठिकाणी नवीन पोल टाकण्यात आले होते. सदर पोल वरून विज कनेक्शन सुरु करण्यासाठी तक्रारदार यांनी महावितरण कार्यालय शिरसोली येथे गेले होते. वरिष्ठ तंत्रज्ञ विक्रांत अनिल पाटील देसले यांनी सदरचे काम करून देण्याचे मोबदल्यात ३० हजार रुपयेची लाचेची मागणी केली होती. पैकी १० हजार रुपये या अगोदर घेतले होते.

तरीपण विज कनेक्शन चालु करून देत नव्हते. ते विज कनेक्शन चालू करून देण्यासाठी उर्वरीत ठरलेले २० हजार रुपयांची लाचेची मागणी करीत होते. त्याबाबत तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे दि. १८ रोजी तक्रार दिली होती. सदर तक्रारीप्रमाणे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली. त्यानुसार आज दि. ८ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल देसले पाटील याला उर्वरित २० हजार रुपये लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, किशोर महाजन, राकेश दुसाने आदींच्या पथकाने यशस्वी केला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.