जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२५ । ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार असल्याचं सांगितले जात होते. परंतु एप्रिल महिना संपला तरी अद्यापही लाडकी बहीण योजनेचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे आता लाडक्या बहिणींचे लक्ष लागले असताना आता लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्तादेखील कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो.

लाडकी बहीण योजनेत एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला देणार याबाबत आदिती तटकरे लवकरच घोषणा करतील. मार्च महिन्यात जसं फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता दिला गेला होता. तसाच हप्ता आता मे महिन्यातदेखील दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एप्रिल-मे महिन्याचे ३००० रुपये एकत्र येणार?
एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकाच महिन्यात येणार हे नक्की आहे. परंतु हा हप्ता एकत्र येणार की वेगवेगळ्या दिवशी याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.परंतु लवकरच हे पैसे दिले जातील. त्यामुळे मे महिन्याकडे लाडक्या बहिणी आशेने पाहत आहेत. आता लाडक्या बहिणींना मे महिन्यात ३००० रुपये मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












