जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केल्याने राज्यातल सत्तांतरानंतर झाले. यामुळे संपूर्ण राज्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पडले आहे. मोठ्या प्रमाणावर पदाधिकरी हे शिंदे यांना समर्थन देत आहेत. आधी आमदार मग खासदार त्यानंतर माजी आमदार आणि इतर शिवसैनिक शिंदे यांना समर्थन देत आहेत. यातच आता जळगाव मनपामध्ये शिवसेनेला खिंडार पडणार असे म्हटले जात आहे,
जळगाव महापालिकेत शिवसेनेत गेलेल्या भाजप बंडखोर नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर आता मूळ शिवसेनेतदेखील मोठी गळती लागण्याची शक्यता असून, याबाबत काही नगरसेवकांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबतदेखील प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच राज्यातील सत्तांतरानंतर राज्यात भाजप व शिंदे गटाची सत्ता आल्यामुळे मनपातील शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच महापालिकेच्या महापालिकेत सद्यस्थितीत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, बहुमत शिवसेनेकडे नाही.त्यातच सध्याच्या राजकीय स्थितीच्या हवेचा अंदाज घेऊन, हवेच्या प्रवाहासोबत जाण्याची तयारी नगरसेवकांची आहे.
सार्वत्रिक निवडणुका एका वर्षावर आल्यामुळे व शहरातील अनेक कामे थांबल्यामुळे नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. राज्यातील सत्तेच्या माध्यमातून जर ठरावीक नगरसेवकांच्याच प्रभागातील आहे. कामांना निधी मिळून इतर प्रभागांच्या कामांसाठी निधी मिळाला नाही तर कामे रखडून पुढील निवडणुकांमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेतील चार ते पाच नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर जाण्याच्या तयारीत आहेत.