जळगाव जिल्हामहाराष्ट्रराजकारण

शिवसेना खडसेंचा गेम करणार की पवारांच्या शब्दाला जागणार ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । १९ जून २०२२ । विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीला अवघे काही तास उरले आहेत. अशातच विधान परिषद निवडणुकीत मध्ये राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाचे माजी नेते एकनाथ खडसे यांना आपला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मात्र ज्या खडसेंनी 2014 सली भाजप-सेनेची युती तोडली त्या खडसेंना शिवसेना आमदार पवारांच्या शब्दाला जागून मतदान करणार की विधान परिषद निवडणुकीमध्ये खडसेंचा ‘गेम’ करत जुना वचपा काढणार ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

भारतीय जनता पक्षामध्ये असताना एकनाथराव खडसे यांनी शिवसेनेची व भारतीय जनता पक्षाची सत्ता 2014 साली येण्यासाठी पंचवीस वर्षाची युती तोडली होती. शिवसेनेचे कित्येक आमदार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांमुळे पडले होते. अशावेळी शिवसेनेमध्ये खडसेंनी विरुद्ध मोठी लाट होती. त्यानंतर खडसेंच्या खडतर काळात देखील शिवसेनेने त्यांची बाजू घेतली नव्हती. उलट त्यांच्या विरोधात प्रचार केला होता. खडसेंनी तोडलेली युती ही शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याने त्यावेळी खडसेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला तेव्हा शिवसेनेने जळगावात तर अक्षरशः फटाके फोडले होते. यामुळे शिवसेना आणि खडसे यांच्यातला वाद काही लपू शकला नाहीये. यामुळे हाच टोकाचा वाद आता विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिसेल की शरद पवार यांचा शब्द शिवसेना आमदार पाहतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे

गेल्या वर्षी एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. महाविकास आघाडी महाराष्ट्रात नावा लौकिकात आली असल्यामुळे ठाकरे पवार यांचे अतिशय जवळचे संबंध संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर खडसे यांना राष्ट्रवादीने स्वीकारला आहे मात्र महाविकास आघाडीत खडसे यांना शिवसेना स्वीकारेल का? आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये खडसे यांना शिवसेना मतदान करेल का? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित असून निकाल लागल्यावर या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आमदार झाले तर मंत्री नक्कीच होतील अशा देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्याने खडसेंपासून भारतीय जनता पक्षाला प्रमाणेच शिवसेनेला देखील खडसे टार्गेट करतील असे मत शिवसेना नेत्यांचे असल्यामुळे खडसे यांना आमदारच करायचं नाही अस मत एका शिवसेनेच्या गटांच आहे. मात्र आपण महाविकास आघाडीचे सदस्य आहोत आणि आपण आपला युती धर्म पाळायला हवा से स्पष्ट मत शिवसेनेच्या दुसर्‍या गटाचे आहे. यामुळे खडसेंच्या आमदारकी मुळे देखील शिवसेनेमध्ये मतमतांतरे पाहायला मिळत आहेत शिवसेनेतला एक गट खडसेंचा विरोधातला तर एक गट खडसे यांच्या समर्थनार्थ उभा आहे. अशा वेळी उद्या होणार्‍या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये खडसेंचा गेम होतो की पवारांचा शब्द शिवसेना आमदार पाळतात हे पाहणं लक्षणीय असणार आहे.

उद्धव ठाकरेंची भुमिका महत्त्वाची
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना मतदान करायचं की नाही याबाबत शिवसेना आमदारांमध्ये जरी मतमतांतरे असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मत हे शेवटचं आहे. ते जे म्हणतील तेच शिवसेना आमदार करतील यात वाद नाही. यामुळे या सर्व प्रकरणांमध्ये उद्धव ठाकरे यांचा मत काय आहे हेच ठरवेल की शिवसेना आमदार खडसे यांना मतदान करणार की नाही ?

Related Articles

Back to top button