सोमवार, डिसेंबर 11, 2023

जळगाव जिल्ह्यातील अजून एका आमदाराला मंत्रीपद मिळेल का?

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । राज्य शासनाच्या मंत्रिमंडळालाचा लवकरच विस्तार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते ठाण्यात बोलत होते. शिंदे यांनी केलेल्या विधानानंतर जळगाव जिल्ह्यातील अजून एका आमदाराला मंत्रीपद मिळेल का? असा प्रश्न महत्वाचा बनला आहे.

ठाणे येथे पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल आहे. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. नरेंद्र मोदी यांचे मी अभिनंदन करतो. भाजपाला धन्यवाद देतो. आम्ही पन्नास लोकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला त्यावेळी फडणवीस आणि त्यांची टीम आमच्या सोबत होती.

तर दुसरीकडे मंत्रीमंडळ विस्ताराची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये जळगाव जिल्ह्यातील अजून एका नावाचा समावेश होणार का?असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याचे कारण म्हणजे जळगाव जिल्ह्यात सध्या दोन मंत्री पद आहेत. यात एक मंत्रीपद वाढू शकते असं म्हटलं जात आहे.