⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

नव्या वर्षात तरी जळगावचे लोकप्रतिनिधी जळगावला हॅप्पी करतील का?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२३ । संपूर्ण जगात नववर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर देशात राज्यात आणि जिल्ह्यात. मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. मात्र गेल्या कित्येक वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेल्या जळगावकरांच येणार वर्ष तरी हॅप्पी ठरेल का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारून लागले आहेत. (development of jalgaon city)

एखाद्या शहराची एखाद्या प्रदेशाची जनता सुखी कधी असते? जेव्हा त्या प्रदेशाचा विकास होतो. म्हणजेच प्राथमिक सुविधा किंबहुना मूलभूत सुविधा त्या शहराच्या नागरिकांना मिळतात. मात्र शहरात सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधाच मिळत नाहीयेत. त्यानंतर रोजगार व आदी सुविधा या देखील मिळत नाहीयेत. मात्र नागरिक सध्या केवळ आणि केवळ रस्ते मागताय रोजगाराशिवाय राहू पण अधि चालायला किंवा इकडून तिकडे जायला साधे रस्ते तर द्या अशी मागणी करत आहे. याचबरोबर मूलभूत सुविधा नसल्याने विकास होत नाही. शहरात रोजगार येत नाही. रोजगारा अभावी संपूर्ण शहरात गुंडगिरी वाढली आहे.

जळगावच्या खड्ड्यांचा आता नागरिकांना रागही यायचा बंद झाला आहे. सध्या खड्डा पहिला की लोक सहन करतात मग त्यावर मिम किंवा जोक बनवतात. शहरात काही ठिकाणी रस्त्याची काम सुरू झाली आहेत. तर काही ठिकाणी नवीन रस्ते बनले आहेत. मात्र ते केवळ किंवा मुख्य रस्ते आहेत. जरा आत गल्लीत गेलो की समजत, की शहराला रस्त्याची किती गरज आहे. याचबरोबर शहरातल्या ज्या वस्त्यांमध्ये खऱ्या अर्थाने रस्त्यांची गरज आहे. तिथे मात्र अजूनही खड्डे आहेत आणि नागरिकांच कंबर्ड मोडतच आहे. (jalgaon bad rodes)

दुसरीकडे, महानगरपालिकेमध्ये पाहायला गेलो तर, कोणता नगरसेवक कोणत्या पक्षात? कोणालाच सांगता येणार नाही. गेल्या दोन वर्षात बहाद्दर नगरसेवकांनी दोन दोन पक्ष बदलले आहेत. पर्यायी महानगरपालिका काही लोकांच्या हातून चालत आहे. आपला प्रभागाचा विकास करायचा कसा? हे अजूनही काही नगरसेवकांना समजत नाही. शहराचा विकास म्हटलं की राजकीय विचारसरणीपेक्षा विकास हाच महत्त्वाचा असतो मात्र सध्या शहराचा विकास कोणीच करू शकत नाही म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष केवळ आणि केवळ राजकारण करत आहे. यात फरपट होते आहे ती आपल्या जळगाव शहराच्या नागरिकांची. यामुळे आता राजकारण बाजूला ठेवून विकासाचा राजकारण करत या वर्षी आपल्या जळगावचे लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने जळगावला हॅप्पी करतील का? हा प्रश्न समोर येत आहे. (Jalgoan non developed city)