कापसाला चांगला भाव मिळणारंच ? वाचा काय आहे तज्ज्ञांचे मत !

फेब्रुवारी 28, 2023 5:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ । शेतकऱ्यांनी भाव मिळत नाही म्हणून एकीकडे कापूस घरात साठवून ठेवला आहे तर दुसरीकडे. घरात साठविलेल्या कापसाला आता कीड लागून कापसाचे वजनही कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाका वाढल्याने कापूस पूर्णता कोरडा होत आहे. मात्र आता कापसाचा भाव वाढू शकतो. असे मत तज्ज्ञ वर्तवत आहेत.

कापसाच्या दरवाढी साठी पोषक स्थिती निर्माण झालेली आहे. तरी देशभरातील कापूस बाजार भाव दबावात आहे.तज्ञांच्या मते देशभरात कापसाच्या बाजार भाव वाढीसाठी पोषक वातावरण असून दरवाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कापसाला बाजार भाव वाढून देण्याची मानसिकता उद्योगांची नसल्याची खंत शेतकरी वर्तवत आहे

cotton

परंतु तज्ञांच्या मते जास्त काळ कापसाचे भाव दबावात ठेवू शकणार नाही. संपूर्ण देशभरातील कापूस दरामध्ये सुधारणा होत असून अनेक दिवसांपासून नरमलेले असणारे कापसाचे बाजार भाव थोडाफार प्रमाणात का होईना पण वाढतील.

जिल्ह्यातील कापसाचा भाव हा ७५०० ते ८००० रुपये इतका आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव मिळत नसल्याने भाववाढ कापसाचा भाव १०००० झाला नाहीये. यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस घरात ठेवला आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस अद्याप शेतकऱ्यांच्या घरात आहे.यामुळे कापसाला भाव मिळेल अशी अशा शेतकरी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now