⁠ 
रविवार, मे 5, 2024

शिंदे – फडणवीस – पवार सरकार मधले ४ मंत्री बसणार घरी ?

लवकरच महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार होईल असं म्हटलं जात आहे. 17 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची आता शक्यता आहे. आता या मंत्रिमंडळामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातला नक्की कोण कोण येतं कोणत्या आमदारांना संधी मिळते हे पाहणं अतिशय उत्सुकतेच ठरणार आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये 14 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाईल अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ मंत्री पदाची शपथ घेतल्याने त्यांना कोणकोणत्या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद मिळते ही पहाणे अतिशय उत्सुकतेचे ठरणार आहे.

सध्याच्या सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील काही आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो अशा चर्चा आहेत. शिवसेनेतील पाच आमदारांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल असे म्हटले जात आहे. शिदेंच्या ४० आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशावेळी नक्की कोण मंत्री होत. हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असून 40 पैकी काही आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे.