---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

राज्यातील पहिलीच घटना जळगावात… पत्नी महापौर… पती विरोधीपक्षनेता…

jayashrimahajan sunil mahajan
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३  मार्च २०२१ । भाजपकडे स्पष्ट बहुमत असतांना नवग्रहांच्या जोरावर सत्ता खेचून शिवसेनेने जळगाव महापालिकेवर पहिल्यांदाच भगवा फडकवला आहे. यामुळे सध्या भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. परंतु यात एक नवीच विक्रम झाला आहे. विद्यमान विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री महाजन या शिवसेनेच्या महापौर झाल्या आहेत.

jayashrimahajan sunil mahajan

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच घरात महापौर आणि विरोधीपक्ष नेते अशी दोघे पदे आली आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ७५ पैकी ५७ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली. शिवसेनेला अवघ्या १५ जागा मिळाल्या होत्या. एमआयएमच्या तीन जागा असल्याने विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेला मिळाले. बंडखोर नगरसेवकांना अद्यापही स्वतंत्र गट स्थापन करता आलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडेच कायम राहिले आहे.

---Advertisement---

येत्या काही दिवसात हे पद शिवसेनेकडे राहते कि भाजप यावर दावा ठोकते हे पाहावे लागेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---