⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | बायकोने दिला घटस्फोट, संतप्त जावयाने केले असे काही..

बायकोने दिला घटस्फोट, संतप्त जावयाने केले असे काही..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२२ । बायकोने घटस्फोट दिल्याचा राग आल्याने चक्क संतप्त जावयाने सासऱ्याचे वाहन अन्‌ घर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात घडला आहे. या प्रकणी शनिपेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अमीर जावेद खाटीक (वय ४०) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. खाटीक हे शनिपेठेत माजी महापौर भारती सोनवणे यांच्या घराशेजारील गल्लीत आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. ते मटण-चिकन विक्रीचा व्यवसाय करुन कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवतात. दि. ३१ ऑगस्ट रोजी ते आपल्या कुटुंबीयांसह बाहेरगावी मध्यप्रदेशात गेले होते. घरबंद असल्याची संधी साधत मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींने त्यांच्या घराबाहेर उभी मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना घडली. मोटारसायकल पेटवल्याने आगीचा भडका उडून घराचा काही भागही जळाला आहे.

सकाळी खाटीक कुटुंबीय परतल्यावर त्यांना घर आणि दुचाकी जळाल्याचे आढळून आले. त्यांनी शनिपेठ पोलिसात धाव घेतली. त्याचप्रमाणे परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यावर एक दुचाकीस्वार दूरवर वाहन लावून पायी चालत आला. नंतर त्याने खिशातून पेट्रोलची बॉटल काढून वाहनावर ओतून पेटवून दिल्याचे आढळून आले आहे. वाहन पेटवणारा खाटीक कुटुंबीयांचा जवाई आदिल ऊर्फ शाहरुख सलिम खाटीक असल्याचे फुटेजवरुन स्पष्ट झाले आहे.

आदिल ऊर्फ शाहरुख सलीम खाटिक याच्याविरुद्ध अमीर खाटीक यांच्या मुलीने कौटुंबीक हिंसाचार प्रकरणी तक्रार दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तीन महिन्यापूर्वीच या प्रकरणी घटस्फोट झाला असून भिती निर्माण करण्यासाठी आदिलने जाळपोळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह