⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | कौटुंबिक वाद विकोपाला! पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू, जामनेरातील घटना

कौटुंबिक वाद विकोपाला! पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू, जामनेरातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२४ । खुनाच्या घटनेमुळे जामनेर तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीला केलेल्या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील गोद्रि येथे घडलीय. काजल विशाल चव्हाण (वय २४) असं मयत महिलेचे नाव असून याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकी घटना?
जामनेर तालुक्यातील गोद्रि येथे काजल ही पती विशाल, सासू-सासरे यांच्यासह राहत होती. काही महिन्यांपूर्वीच विशाल आणि काजलचा विवाह झालेला आहे. दरम्यान मागील गेल्या अनेक दिवसापासून दोघं पती-पत्नीमध्ये कौटुंबिक विषयावरून वादविवाद होते. हे वाद मिटवण्यासाठी कुटुंबातील काही सदस्यांनी प्रयत्न देखील केला होता. मात्र रविवार रात्री दोघांचा वाद विकोपाला गेला.

त्यानंतर विशालने संतप्त होऊन काजलच्या तोंडावर, नाकावर, दांड्याने आणि इतर धारदार वस्तूने मारहाण केली. या मारहाणीमध्ये काजल ही जागीच गंभीर जखमी झाली. दरम्यान ग्रामस्थांनी जखमी काजलला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. यावेळी काजोलचा नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. पोलिसांनी पती विशाल याला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.