⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

‘त्या’ संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही? पल्लवी सावकारेंचा सवाल

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । पाझर तलावातून उत्खनन झालेल्या गौण खनिजाच्या रॉयल्टीच्या फसवणूक प्रकरणात ठेकेदारांनी रक्कम भरल्यानंतर आता अधिकाऱ्यांवरील कारवाई आराम बस्त्यात आहे.गेल्या महिनाभरापासून याबाबत हालचाली सुरू झाल्या असल्या तरी लघुसिंचन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही, असा सवाल तक्रारदार सदस्य पल्लवी सावकारे यांनी उपस्थित केला आहे.

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या गौण खनिज प्रकरणात पल्लवी सावकारे यांनी वर्षभरापासून पाठपुरावा केल्यानंतर सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी या प्रकरणात १४ ठेकेदारांकडून ३४ लाखांची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते.यात ठेकेदारांनी रक्कम भरली, तसेच या भ्रष्टाचारास अधिकारी जबाबदार असल्याचे लेखी पत्र दिले होते. संबंधित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे; मात्र अद्याप कारवाई नसल्याने याबाबत तक्रारदारांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.