जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२३ । मोबाईलने आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान पटकावले. तेव्हापासून त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. इतका की, कोणतीही गोष्ट करताना हातात मोबाइल दिसू लागला. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्याचप्रमाणे मोबाईलचे दुष्परिणाम दिसू लागले. त्याचा वापर वाढला की मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना घडतात. काही महिन्यांपासून आपण दररोज बॅटरी स्फोटांच्या बातम्या ऐकत असतो. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. बिहारमधील एका युझरने त्याचा शाओमी फोन ब्लास्ट झाल्याचे सांगितले. बॅटरीशी छेडछाड झाल्यामुळे ही घटना घडल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
फोन का फुटतात?
यापूर्वीही फोन फुटल्याच्या किंवा ब्लास्ट झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. पण आता प्रश्न असा आहे की स्मार्टफोनचा स्फोट का होतो? बहुतेक प्रकरणांमध्ये फोनच्या बॅटरीमुळे स्फोट होतो. अशा स्थितीत तुमच्या फोनची बॅटरी चांगली आहे की नाही हे तपासण्यासोबतच बॅटरीची काळजी घ्यावी लागेल. आजकाल बहुतेक कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरतात, ज्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक इलेक्ट्रोड असतात, ज्यामुळे ते रिचार्ज होऊ शकते. जेव्हा फोनच्या बॅटरीचे काही भाग खराब होतात. तेव्हा अनेकदा फोनचा स्फोट होण्याची भीती असते.
फोनची बॅटरी खराब होण्याची अनेक कारणे असू शकतात, सर्वात सामान्य कारण म्हणजे उष्णता. त्यामुळे चार्जिंग करताना किंवा जास्त वापर करताना बॅटरी लवकर तापली तर फोनची बॅटरी खराब होऊ शकते. यामुळे थर्मल रनअवे नावाची साखळी प्रतिक्रिया होऊ शकते. या प्रक्रियेमुळे बॅटरी खूप गरम होते, ज्यामुळे फोनला आग लागते. याशिवाय फोन पडणे, जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहणे, सीपीयूमधील मालवेअर आणि चार्जिंग सर्किटमधील समस्या यामुळेही बॅटरी खराब होऊ शकते. काही घटना स्मार्टफोनच्या जुन्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग दोषामुळे देखील असू शकतात. समजा तुम्ही अनेक वर्षांपासून एखादे उपकरण वापरत आहात, तर बॅटरीचे अंतर्गत घटक संपुष्टात येऊ शकतात आणि बॅटरी फुगू शकते किंवा जास्त गरम होऊ शकते, त्यामुळे याची खातरजमा करायला हवी.
अलीकडचे फोन स्मार्ट असल्याने अशा घटनांची पूर्वसूचना देतात. काही पॉपिंग आवाज किंवा जळणाऱ्या प्लास्टिकचा वास येतो. किंवा फोन जास्त गरम होऊ शकते. युझर्सनी या गोष्टी लक्षात ठेवून फोन वेळेवर त्याच्या डॉक्टरकडे नेला पाहिजे.
स्फोटापासून फोन कसा वाचवायचा?
फोन शक्यतो पडू देऊ नका
सूर्यप्रकाश आणि अति बाह्य तापमानापासून दूर रहा.
वेळोवेळी तुमची बॅटरी तपासा आणि बॅटरीची स्वच्छता राखा.
इतर कोणतीही चार्जिंग केबल आणि चार्जर वापरण्याऐवजी, फोन ब्रँडद्वारे प्रदान केलेली केबल आणि चार्जर वापरा.
तुमच्या फोनला व्हायरसपासून सुरक्षित ठेवा. कारण ते तुमच्या फोनच्या बॅटरीला हानी पोहोचवू शकते.