---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

जळगावचे रस्ते होणार तरी कधी ? रस्त्यांची निविदा रखडली !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२३ । मनपाच्या महासभेत दि.३० रोजी शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी ना हरकत दाखला देण्याचा ठराव करण्यात आला. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मनपाला रस्त्यांची अंतिम यादी दिली जात नसल्यामुळे महापालिकेकडून त्यांना ना हरकत दाखला दिला जात नाही, त्यामुळे अंतिम यादी व एनओसीच्या फेऱ्यात शहरातील रस्त्यांची निविदा रखडली आहे.

jalgoan mnp

राज्यशासनाकडून शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील २५७ रस्ते तयार करण्यात येणार आहेत. या रस्त्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार असल्यामुळे सां.बा.विभागाने महापालिकेकडे रस्त्यांच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्या अनुषंगाने महापालिकेने दि.३० रोजी झालेल्या महासभेत ना हरकत दाखला देण्याचा ठराव केला मात्र, आधी आम्हाला रस्त्यांची अंतिम यादी द्या त्यानंतर आम्ही ना हरकत देवू असे मनपाच्या बांधकाम विभागाने सां.बा.विभागाला कळविले होते.

---Advertisement---

परंतु सां.बा.विभागाकडून मनपाला सोमवार पर्यंत रस्त्यांची अंतिम यादी देण्यात आलेली नव्हती त्यामुळे मनपाने देखील त्यांना ना हरकत दाखला अद्यापपर्यंत दिलेला नाही, महासभेत सार्वजनिक बांधकाम विभागाला ना हरकत दाखला देण्याचा ठराव होऊन २० दिवस उलटले असले तरीही सां.बा.विभागाकडून अंतिम यादी मिळत नसल्यामुळे मनपाच्या बांधकाम विभागाकडून त्यांना ना हरकत दाखला दिला जात नसल्यामुळे शहरातील प्रस्तावित रस्त्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया लांबणीवर पडली असून नागरिकांना रस्त्यांसाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---