⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

जळगावची विमानसेवा सुरू कधी सुरु होणार? समोर आली मोठी माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२४ । मागील गेल्या तीन वर्षांपासून जळगावची विमानसेवा बंद पडली आहे. मात्र आता जळगावहून विमानसेवा लवकरच सुरु आहे. गेल्या आठवड्यात भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जळगावची विमानसेवा सुरू करायला अंतिम मंजुरी दिली. त्यानुसार केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून हैदराबाद, गोवा, पुण्यासाठी विमानसेवा लवकरच सुरु होणार आहे.

मात्र, डीजीसीएने जळगावच्या आधी कोकणातील विमानसेवा सुरू करण्याबाबत विमान कंपनीला परवानगी दिली आहे. त्यामुळे विमान कंपनीतर्फे जळगाव व्यतिरिक्त येत्या १८ मार्चपासून गोवा ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्यात येत आहे, तर पुढील आठवड्यात जळगावची विमानसेवा सुरू करायला डीजीसीए अर्थात, भारतीय प्राधिकरणातर्फे परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर पर्यटन विकास फाउंडेशन सिव्हिल एव्हिएशनचे अध्यक्ष सुमित कोठारी यांनी दिली.

केंद्र शासनाच्या उड्डाण योजनांतर्गत गेल्या आठवड्यात ६ मार्चला डीजीसीएने जळगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी फ्लाय ९१ या विमान कंपनीला अंतिम मंजुरी दिली. मात्र, तांत्रिक कारणामुळे डीजीसीएने संबंधित विमान कंपनीला आधी कोकणातील विमानसेवा सुरू करण्याचे सांगितले. त्यानुसार, फ्लाय ९१ या विमान कंपनीतर्फे १८ मार्चपासून गोवा, बेंगलोर व सिंधुदुर्ग ही विमानसेवा सुरू होणार आहे. दरम्यान, डीजीसीएने जळगावच्या आधी इतर शहरांना विमानसेवा सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी पुढील आठवड्यात जळगावची विमानसेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.