---Advertisement---
राष्ट्रीय

व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक, इंस्टा जगभरात डाऊन ; नेटकऱ्यांमध्ये गोंधळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । जगभरातील नेटकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन बसलेल्या व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक, इंस्टाग्रामची गेल्या तासभारपासून बत्ती गुल झाली आहे. तिन्ही सोशलमीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाले असल्याने प्रचंड गोंधळ उडाला आहे. दरम्यान, सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमके कारण काय आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

whatsapp insta fb down jpg webp

सर्व्हर अचानक बंद झाल्याने सर्वत्र संभ्रम

---Advertisement---

जगात लोकप्रिय असणारे मेसेंजिग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडले आहे. सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या आहेत. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स सध्या बंद पडली आहेत. हा प्रकार साधारणपणे गेल्या दीड तासापासून जाणवत आहे. व्हॉट्सअ‌ॅप नवे मेसेज सेंड आणि रिसिव्ह होत नाहीय. त्याचबरोबर व्हॉट्सअ‌ॅप स्टेटसही अपलोड होण्यास अडचणी येत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम रिफ्रेश होण्यास अडचणी येत आहेत.

ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड

व्हॉट्सअ‌ॅप अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही. व्हॉट्सअ‌ॅपझ इन्स्टाग्राम, फेसबुक यांचे सर्व्हर डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी ट्विट करत सर्वांना तशाच अडचणी येत आहेत का? अशी शंका विचारली. अवघ्या काही क्षणात ट्विटरवर या संदर्भात इतके ट्विट आले की हा मुद्दा ट्विटरवर ट्रेंड करायला लागला आहे.

फेसबुकने व्यक्त केली दिलगिरी
आम्हाला माहिती आहे की काही लोकांना आमच्या अँप्स आणि उत्पादनांमध्ये प्रवेश करण्यात समस्या येत आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी पूर्ववत करण्यासाठी काम करत आहोत आणि कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. असे स्पष्टीकरण फेसबुककडून देण्यात आले होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---