आधार कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर करणार? वाचा सविस्तर
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । आजकालच्या युगात ऑक्सिजन पाणी आणि अन्न या सकट जी गोष्ट सर्वात जास्त लागते ती म्हणजे आधार कार्ड. कोणताही काम असो आधारकार्ड लागताच. मात्र तेच जर हरवल तर ? तर तुम्ही काय करणार? जाणून घेण्यासाठी हे नक्की वाचा.
आधारकार्ड शिवाय काम पुढे सरकतच नाही. पण बऱ्याचदा नेमक्या गरजेच्या वेळी आपल्याला आधार कार्ड सापडत नाही. ते कुठे ठेवले आहे ते लक्षात येत नाही. कधीतरी तुमच्या पाकिटासोबत आधार कार्डही चोरीला जाते आणि त्याशिवाय आपली कामे खोळंबून राहतात. पण त्यामुळे अस्वस्थ व्हायचं कारण नाही. मग अशा वेळी काय करायचं? कसं मिळवायचं आधार कार्ड? कारण काही ठिकाणी तुम्हाला मूळ (ओरिजिनल) आधार कार्डही दाखवावं लागतं.
१- युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (UIDAI) पोर्टलवर जा. ‘Order Aadhaar Reprint (Pilot Basis)’ या पर्यायावर क्लिक करा.
२. या ठिकाणी तुमचा बारा आकडी आधार कार्ड नंबर किंवा सोळा आकडी ‘व्हर्च्यूअल आयडी’ (VID) आणि सिक्युरिटी कोड टाका.
३- ‘सेंड ओटीपी’ या बटनावर क्लिक करा. तुमचे आधार कार्ड ज्या मोबाइल क्रमांकाशी लिंक आहे त्यावर तुम्हाला ‘ओटीपी’ मिळेल.
४- मोबाइलवर आलेला हा ओटीपी त्याठिकाणी टाका आणि ‘सबमिट’चे बटन दाबा.
५. तुमच्या स्क्रीनवर ‘आधार प्रिव्ह्यू’ असा विभाग दिसेल. त्यावर तुमच्या आधारकार्डची सर्व डिटेल्स दिसतील. ती चेक करा.
६- त्याठिकाणी असलेले तुमचे नाव, इतर माहिती बरोबर आहे का, हे लक्षात आल्यावर ‘मेक पेमेंट’ या पर्यायावर क्लिक करा,
७- यूपीआय / नेट बैंकिंग / डेबिट / क्रेडिट कार्ड असे पर्याय तुम्हाला दिसतील. त्यातील योग्य तो पर्याय निवडा.
८- पैसे भरल्यानंतर डुप्लिकेट आधार कार्डाबाबतची तुमची विनंती मान्य केली जाईल आणि एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (एसआरएन) जनरेट होईल.