⁠ 
सोमवार, जून 17, 2024

गिरीश महाजन यांनी नाकारलेली वाय प्लस सुरक्षा म्हणजे नेमकी कशी असते?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १३ डिसेंबर २०२२ | भाजपाचे वजनदार नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी वाय प्लस सुरक्षा नाकारली. गिरीश महाजन यांच्यासारखे बडे नेते नेहमीच पोलीस व सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात असतात. यामुळे एक्स, वाय, वाय प्लस, झेड प्लस सुरक्षा म्हणजे नेमके काय म्हणजे काय? असा प्रश्‍न अनेकांना पडतो. आज आपण ना.महाजन यांनी नाकारलेली वाय प्लस व अन्य दर्जाच्या सुरक्षा म्हणजे काय? याची माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांना ०९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त अतिरिक्त वाय+ (Y+) सुरक्षा देण्यात आली होती. परंतु ही सुरक्षा आपल्याला नको असं म्हणत महाजनांनी सुरक्षा नाकारल्याचं पोलीस महासंचालकांना कळवलं आहे. याबाबतचं पत्र मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना पाठवले आहे. राज्यातील पोलिस यंत्रणेची उपलब्ध संख्या तसेच पोलिस कर्मचार्‍यांवरिल वाढता कामाचा ताण याचबरोबर पोलिस विभागातील वाहनांची कमतरता या सर्व बाबींचा विचार करता मला पुरवण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात यावी असे त्यांनी महासंचालकांना पाठलिवेल्या पत्रात म्हटले आहे.

देशात केवळ राजकीय नेत्यांनाच सुरक्षा पुरवली जाते असे नाही. अगदी सर्वसामान्य व्यक्तींना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. यासाठी काही निकष ठरविण्यात आले आहे. सुरक्षा देताना त्या व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे, यावर त्याला कोण्या प्रकारची सुरक्षा द्यायची हे ठरवले जाते. सुरक्षा देण्याआधी त्यासाठी तज्ञांची एक समिती संबंधित व्यक्तीच्या धोक्याबाबत सखोल अभ्यास करून तो अहवाल सरकारकडे पाठवते. या समितीच्या अहवालानंतरच सुरक्षा पुरवण्यात येते. आपल्या देशात एसपीजी, एक्स, वाय, वाय प्लस, झेड प्लस या सुरक्षा पुरविल्या जातात.

एसपीजी (SPG): देशातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींना एसपीजी पुरक्षा पुरवली जाते. एसपीजी सुरक्षा ही देशातील सर्वोच्च सुरक्षा आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असते एसपीजीवर (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) असते. एसपीजी सुरक्षा दलातील जवानांकडे अत्याधुनिक शस्त्रे असतात. एसपीजी गार्ड्स भारतीय सैन्यदलाबरोबर बीएसएफ, आयटीबीपी, एनएसजीमधून निवडण्यात येतात.

झेड प्लस (Z+) : एसपीजीनंतर झेड प्लस सुरक्षा ही सर्वात मोठी सुरक्षा असते. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना झेड प्लस सुरक्षेचे कवच असते. यात एक पोलीस अधिकार्‍यासह दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. पहिले सुरक्षेचे कडे हे एनएसजी कमांडो यांचे असते. तर दुसरे सुरक्षेचे कवच हे एसपीजी कमांडोद्वारे ठेवलेले असते. त्यात आयटीबीपी आणि सीआरपीएफ जवानांचा समावेश आहे. एस्कॉर्ट आणि पायलट वाहनांची सुविधा देखील दिली जाते.

झेड सुरक्षा (Z) : राज्यातील मंत्री, माजी मुख्यमंत्री यांच्यासह ज्यांच्या जीवाला जास्त धोका आहे. त्यांना झेड सुरक्षा दिली जाते. यात २२ सैनिकांची सुरक्षा कवच असते. यामध्ये चार किंवा पाच एनएसजी कमांडो आणि एका पोलिस अधिकार्‍याचा देखील समावेश असतो.

वाय प्लस सुरक्षा (Y+) : राज्यातील मंत्री, राजकीय पक्षांचे नेते आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना वाय प्लस सुरक्षा देण्यात येते.

एक्स आणि वाय सुरक्षा (X & Y) : खासदार, आमदार यांच्यासह राजकीय पक्षांच्या ठराविक लोकप्रतिनिधींना एक्स आणि वाय सुरक्षा देण्यात येते.