⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहरवासीयांनो लक्ष द्या! या भागात होणार आजचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

जळगाव शहरवासीयांनो लक्ष द्या! या भागात होणार आजचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२४ । जळगाव शहरवासीयांसाठी पाणीपुरवठ्या संबंधित एक महत्वाची बातमी आहे. महावितरणकडून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाधूर पंपींग स्टेशन व उमाळा जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत वाहिनीवरील झाडांच्या फांद्या तोडणे, विद्युत वाहिनी दुरुस्तीची कामे आज शनिवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

शनिवारचा पुरवठा आता रविवारी केला जाणार आहे. पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून वाचूर पंपिंग स्टेशन व उमाळा जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत वाहिनीवरच्या झाडांच्या फांद्या तसेच विद्युत वाहिनीची दुरुस्ती शनिवारी सकाळपासून केले जाणार आहे. यामुळे काही तासांसाठी केंद्रावरचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. परिणामी शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होईल. पाण्याचा वापर जपून करावा लागेल.

रविवारी या भागात पाणीपुरवठा वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर,
आसोदा रोड परिसर, नित्यानंद टाकी परिसर, मोहननगर, नेहरूनगर परिसर, खंडेरावनगर परिसर, हरिविठठलनगर, पिंप्राळा गावठाण परिसर, गायत्रीनगर, नूतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी, मानराजपार्क, दडिकरनगर, असावा नगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी परिसर, खोटेनगर, शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर, योगेश्वर नगर, शंकररावनगर, खेडीगाव परिसर आदी.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.