⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | कापसावरील लाल्या रोगांचे लक्षणे आणि कारणे काय? योग्य व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या कृषी विभागाचा सल्ला..

कापसावरील लाल्या रोगांचे लक्षणे आणि कारणे काय? योग्य व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या कृषी विभागाचा सल्ला..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२३ । कापसामध्ये पाने लाल होणे याला लाल्या रोग असे म्हणतात. या रोगांवर मात करण्यासाठी योग्य वेळी पेरणी (४० डिग्री पेक्षा कमी तापमान झाल्यावर) योग्य वेळी युरियाच्या एक किंवा दोन फवारण्या (१%). मॅग्रेशियम सल्फेटचा वापर (०.५%), शेतात पाणी साचू नये. म्हणून पुरेसा निचरा ठेवणे, फुले आणि बोंड वाढीदरम्यान पुरेशा पोषक द्रव्यांचा पुरवठा, वेळेवर आंतरमशागत, तण काढणी व पुरेसे सिंचन उपलब्ध करणे जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी पीक फेरपालट व आंतरपीक लागवड करून व्यवस्थापन करावे. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

लक्षणे –
पाने लालसर होणे सुरुवातीला परिपक्व पानामध्ये दिसून येते आणि हळूहळू संपूर्ण पानांमध्ये पसरते. सुरवातीला पानांचे कडा पिवळे पडते आणि नंतर लाल रंगद्रव्य तयार होते. कालांतराने संपूर्ण पाने कोरडी होतात आणि नंतर गळून जातात

कारणे –
जमिनीत नत्राची कमी उपलब्धता, पाण्याची कमतरता किंवा पाणी साचण्याची परिस्थिती तसेच विकसनशील बोंडाकरिता नत्राची अधिक गरज यामुळे पानांमध्ये नायट्रोजनची पातळी कमी होते (क्रिटिकल मर्यादेच्या खाली) रात्रीच्या तापमानात अचानक बदल किंवा घट (१५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी), मॅग्रेशियमची कमतरता, पानातील हरीतद्रव्याचा नाश ई. मुळे अँथोसायनिन (लाल) पिग्मेटेशन वाढते.

व्यवस्थापन –
लाल झालेल्या पानांमध्ये नायट्रोजन आणि मॅग्रॅशियमचे प्रमाणे कमी होते. तसेच पानांमध्ये नत्र कमी झाल्यामुळे कार्बोहायड्रेट अधिक जमा होतात परिणामी सी/एन गुणोत्तरात वाढ होते व अँथोसायनिन रंगद्रव्य संचय झाल्याने हा विकार होतो. पान लालसर होणे कोणात्याही वाढीच्या टप्प्यावर उद्भभवू शकते. परंतु सुरुवातीच्या अवस्थेत अधिक नुकसान दिसून येते. पीकावरील रस शोषणाऱ्या किडीमुळे पाले लाल होण्याबद्दल बऱ्याचदा गोधळ होतो. पिकाची गरज व उपलब्ध अन्नद्रव्य संबंधांवर परिणाम करणारे घटक पाने लालसर होण्यास प्रोत्साहन देतात. आणि अति पाऊस किंवा पाऊसाचा खंड पडल्यास अधिक लक्षणे दिसून येतात. त्यानुसार योग्य ते व्यवस्थापन करावे. असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.