⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मनपाने वॉटरग्रेस सोबत केलेल्या करारा नुसार काय आहेत? कामगार विषयक तरतुदी

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेने वॉटरग्रेस या कंपनीला जळगाव शहराची साफसफाई करण्यासाठी गेल्या सव्वा तीन वर्षापासून मक्ता दिलेला आहे. हा मक्ता देताना करारनाम्यात काही कामगार विषयक तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र या कामगारांना माहित नाहींत.

कामगार कायदे विषयक तरतूदी :-

१) मक्तेदारानी त्यांच्यामार्फत सदरील साफ सफाईच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कामगारांना द्यावयाची वेतनाची रक्कम व अतिकालीन भत्त्याची रक्कम ही किमान वेतन कायद्यातील व निविदा अटी शर्तीनुसार कमी नसावी.

२) कामाकरीता मक्तेदार यांना देय मोबदला हा एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतर देण्यात येईल काही तांत्रिक अथवा अपरिहार्य कारणास्तव मोबदला देण्यास उशीर झाल्यास सदर रक्कमेवर व्याज देय राहणार नाही. तसेच देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर कर भरण्याची जबाबदारी सर्वस्वी मक्तेदार यांची राहिल.

३) मक्तेदार हे त्यांच्या वतीने नेमण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांकडूनू दररोज वक्तशीरपणे व नियमीतपणे दैनंदिन साफ सफाईचे काम करुन घेतील त्यांची वर्तणुक व कामाची गुणवत्ता व उत्तरदायीत्व हे म.न.पा.च्या हितसंबंधाचे रक्षण करणेच राहील. तसेच कामगार अयोग्य व अपात्र असल्याचे अथवा त्याचे अशोभनीय वर्तन असल्याचे आढळल्यास त्या कामगारास काढून टाकणेसंबंधीचे आदेश देण्याचे अधिकार घनकचरा व्यवस्थापन प्रमुख यांना राहतील.

४) मक्तेदाराने कंत्राटी कामगारांचा विमा शासकीय विमा निधी कार्यालयाकडेस उतरविणे अनिवार्य आहे. त्याचा पुरावा सादर न केल्यास एकुण विमा रकमेच्या कंत्राटी देय रकमेतून १% रक्कम पहिल्या बिलातुन कपात केली जाईल.

५} घनकचरा संकलन व वाहतूकीचे काम करतांना काही हानी, अपघात इ. होऊन जिवीत वा वित्त हानी झाल्यास त्यांची नुकसान भरपाई करणेची सर्वस्वी जबाबदारी मक्तेदार यांचेवर राहील.

६) भविष्य निर्वाह निधी कायदा, बोनस अॅक्ट, ई.एस.आय.सी. विमा किमान वेतन कामगार कायदयाचे अॅक्ट इ. कायद्यान्वये देय असलेली रक्कम कामगारांना देणे मक्तेदारास बंधनकारक राहील. तसेच कामगारांचे वेतनात वेळोवेळी होणारी वाढ मक्तेदारास अदा केली जाईल. कामगार विषयक अन्य प्रचलीत कायद्याचे काटेकोरपणे पालन करणेची जबाबदारी मक्तेदार यांचेवर राहील.

७) मक्तेदाराने कामावर ठेवलेल्या कामगारांना ओळखपत्र, गडद रंगांचा गणवेश देणे आवश्यक राहील. तसेच कामगारांचे रजिष्टर अद्यावत करुन त्यामध्ये कामगारांचे नाव अलीकडील काळातील रंगीत पासपोर्ट साईज फोटो, जन्मतारीख, आधारकार्ड व संपुर्ण पत्ता इ. आवश्यक बाबी ठेवणे आवश्यक राहील. गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या कामगारांना कामावर ठेवता येणार नाही.

८) किमान वेतन कायदा १९४८ च्या नियमानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन कामगारांच्या बँक खात्यात जमा करणे बंधनकारक राहील. तसेच दर महिन्याच्या मासिक देयकासोबत कामगारांना अदा केलेल्या बँकेकडून प्राप्त वेतनाची यादी व बँकेचे चलन जोडणे मक्तेदारावर बंधनकारक राहिल.

९) घंटागाडी, रिफ्युज कॉम्पॅक्टर वरील काम करणारे तसेच इतर सफाई काम करणारे सर्व कर्मचारी निर्धारित गणवेषात असणे गरजेचे राहील. तसेच मक्तेदाराने प्रत्येक कर्मचाऱ्यांचे गणवेशावर योग्य ठिकाणी त्यांचे नावाचे बोधचिन्ह, नेमप्लेट लावावी लागेल.

१०) मक्तेदाराची निविदा मंजूर झाल्यानंतर Professional Tax Certificate P.F. E.S.I.C. (Employs State Insurance Corporation ) व इतर आवश्यक प्रचलीत शासकिय 13/16 नियमानुसार वेळोवेळी घ्यावे लागणारे नोंदणी प्रमाणपत्र, परवाने त्या त्या संबंधीत कार्यालयाकडून स्वतःच्या जबाबदारीने घ्यावे लागतील किंवा अनुज्ञाप्ती घेऊन त्याची पुर्तता करणे बंधनकारक राहील.

११) मक्तेदारास बालमजूरांना कामावर ठेवता येणार नाही. याकरीता कामगारांचे जन्म तारखेचा पुरावा घेणे बंधनकारक राहील. अॅक्ट The child Labor (Prohibition & Regular) Act १९८६ नुसार बालमजूर कामावर असल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची जबाबदारी जळगांव महापालिकेवर असणार नाही.

१२) राष्ट्रीय चार सण (२६ जाने, १ मे, १५ ऑगष्ट व २ ऑक्टोंबर) या दिवशी कामगारांना भरपगारी सुटी देणे मक्तेदारास बंधनकारक राहिल. घंटागाडी, कॉम्पॅक्टर व इतर सफाई काम करणाऱ्या सर्व कामगारांची हजेरी संबंधीत हजेरी शेडवर बायोमेट्रीक पध्दतीने हजेरी दोन वेळा (काम सुरु होताना व काम संपल्यावर) घेणे मक्तेदारावर बंधनकारक राहील.

१४) घंटागाडी, रिफ्युज कॉम्पॅक्टर इ. सफाई कामगारांच्या वेतनामध्ये किमान वेतन कायदयानुसार काही धोरणात्मक बदल झाल्यास त्या दराने वेतन महापालिकेकडून कंत्राटदारास अदा करण्यात येतील. त्या अनुषंगाने कामगारास वेतन अदा करणेची जबाबदारी मक्तेदाराची राहील.

१५) घरोघरी घनकचरा संकलनाकरीता वाहने व मनुष्यबळ वर्षातील ३६५ दिवस आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करुन देणे मक्तेदारावर यांचेवर बंधनकारक राहील.

१५) एखादे दिवशी वाहन चालक व सफाई कामगार उपलब्ध न झाल्यास पर्यायी वाहन चालक व कामगारांची व्यवस्था मक्तेदार यांना करावी लागेल.

१६) घंटागाडी, रिफ्युज कॉम्पॅक्टर व इतर सर्व साफसफाई काम करणाऱ्या कामगारांना गमबुट, एक गणवेश, हॅण्डग्लोव्हज, मास्क पावसाळयात रेनकोट व इतर आवश्यक संरक्षण साहित्य पुरविणे तसेच कामगारांना प्रशिक्षण देणे मक्तेदारावर बंधनकारक आहे.

१७) मक्तेदाराने नेमलेले कामगार व वाहन चालक हे महानगरपालिकेचे कामगार म्हणून हक्क सांगणार ++ नाहीत व त्यांना म.न.पा. सेवेत सामावून घेतले जाणार नाही. त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना / कुटूंबियांना हक्क सांगता येणार नाही.

१८) नियुक्त कामगार यांना दरमहा १० तारखेपूर्वी किमान वेतन कायदयाप्रमाणे देय असलेले वेतन रोख स्वरुपात अदा न करता संबंधीत कंत्राटी कामगाराच्या नावाने ई.सी. एस. माध्यमातुन (NEFT / RTGS) द्वारे अदा करण्याची जबाबदारी मक्तेदारावर राहील. तसेच भविष्य निर्वाह निधी, ई.एस.आय.सी, विमा इ. कामगारांना देय असलेली रक्कम दरमहा भरणा केल्याचा पुरावा सादर करणे मक्तेदारास बंधनकारक राहिल.

१९) म.न.पा. तर्फे मक्तेदारास देण्यात येणारे देयक करिता आर.टी.जी.एस. करणे कामी मक्तेदाराने आपल्या संस्थेचे बँक खाते क्रमांक व आय.एफ.एस.सी. क्रमांकासह प्रमाणित करुन देणे आवश्यक राहील.