रायसोनी महाविद्यालयात बीबीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । जी.एच.रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात बीबीए शाखेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयात दरवर्षी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते रायसोनी इस्टीट्युटचे संस्थापक स्वर्गीय ग्यानचंदजी रायसोनी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषन करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगीतले की, या कार्यक्रमाचा उद्देश नवीन विद्यार्थ्यांना नवीन वातावरणात जुळवून घेण्यास मदत करणे, नविन प्रवेशीत विद्यार्थ्यांमध्ये संस्थेची आणि महाविद्यालयाची नैतिकता आणि संस्कृती बिंबवणे, त्यांना इतर विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्यांसोबत बंध निर्माण करण्यास मदत करणे आणि त्यांना आपल्या जीवनाच्या उद्देशाची जाणीव करून देणे हा आहे. त्याच बरोबर महाविद्यालयामधील उपलब्ध सर्व सोयीसुविधा जसे ग्रंथालय, महाविद्यालयात उपलब्ध असलेले सर्व अभ्यासक्रम, विद्यार्थी कल्याणाच्या योजना, धोरणे त्याचप्रमाणे खेळ, कला, साहित्य, संस्कृती, मुल्यशिक्षण याविषयीची सखोल माहीती दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची जबाबदारी असून स्वायत्त रायसोनी महाविद्यालयात वेल डिग्री प्रोग्राम, ऑकड्मिक बॅकोक क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन ऑप्रोच आदीची रायसोनी महाविध्यालयात आधीपासूनच सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२०च्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु आहे. तसेच त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची व हॉबी क्लबची माहिती देत विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असते असे सांगत नविन प्रवेशीत विद्यार्थ्यांना सर्व प्राध्यापकांचा परिचय देखील त्यांनी यावेळी करुन दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व उद्योजक राजीव बियाणी यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले कि, जर तुम्ही पूर्ण झोकून देऊन मेहनत केली तर तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, तूम्ही जे काही काम करत आहात त्यात प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक नसाल तर तुम्हाला यश कधीच मिळू शकत नाही. तुमचा प्रामाणिकपणाच तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल. संकटांना न घाबरता मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. सतत कामात व्यस्त राहणारी माणसचं काहीतरी करुन दाखवितात. कोणत्याही कामाचा दर्जा ठेवा. दर्जेदार व प्रामाणिक, सचोटीने काम करा. यश तुम्हाला शोधत येईल. तसेच आजच्या बदलत्या ओद्योगीक जगाचा आढावा घेत प्रत्येक व्यवसायात टेक्नोलॉजीला किती महत्व आले आहे यांचे विविध उदाहरणं देत स्पष्ट केले तसेच आजच्या प्रत्येक व्यवसायात जर ठीकून राहायचे असेल तर टेक्नोलॉजीशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रिया कोगटा तर आभार प्रदर्शन प्रा. ज्योती जाखेटे यांनी केले तसेच एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया, बीबीए विभागप्रमुख प्रा. योगिता पाटील, प्रा. तन्मय भाले, प्रा. मोनाली शर्मा, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. प्रतीक्षा जैन, प्रा. प्राची जगवाणी यांनी सहकार्य केले. तसेच सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.