जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात नववर्षाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग, सॅनीटायझर व विविध नियमांचे पालन करण्याचा संदेश यावेळी दिला.
तसेच निरोगी शरीर राखण्यासाठी माझे आरोग्य चांगले ठेवीन, बाहेरील पदार्थ गरज भासली तरच खाणार, मी जे काम करीन ते व्यवस्थितच करणार, आपल्या अभ्यासाच्या व कामाच्या वेळठरवून त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करणार, दररोज किमान 20 ते 25 मिनिटे चालण्याचा किंवा धावण्याचा व्यायाम करणार.असा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला. दरम्यान, विद्यार्थ्यांनी नववर्षाचे स्वागत अतिशय उत्साहाने केले तर सरलेल्या वर्षाला निरोप सुद्धा यावेळी दिला. आपण ज्या चुका मागील वर्षी केल्या त्या पुन्हा आपल्या हातून होणार नाहीत असा निर्धारही केला.
कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव तसेच स्वाती पाटील यांनी केले तर मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..